महापालिकाक्षेत्रात 15 दिवसात 7860 जेष्ठ नागरिकांचे लसीकरण : 1178 व्याधिग्रस्तानी घेतली लस : महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाक्षेत्रात 21 ठिकाणी लसीकरणाची सोय

सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात 15 दिवसात 7860 जेष्ठ नागरिकांचे कोविशिल्ड लसीकरण करण्यात आले तर 1178 व्याधिग्रस्तानी कोव्हीशिल्डची लस घेतली आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाक्षेत्रात महापालिकेच्या 10 आरोग्य केंद्रासह 21 ठिकाणी कोव्हीशिल्ड लसीकरणाची सोय करण्यात आली आहे.
1 मार्च पासून सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिका क्षेत्रात जेष्ठ नागरिक आणि 45 ते 59 या वयोगटातील व्याधीग्रस्त यांच्या कोव्हीशिल्ड लसीकरणाला सुरवात झाली. यामध्ये 1 मार्च ते 15 मार्च या 15 दिवसाच्या काळात मनपा क्षेत्रात 7860 जेष्ठ नागरिकांनी तर 1178 व्याधिग्रस्तानी कोव्हीशिल्डची लस घेतली आहे. मनपा क्षेत्रात 21 ठिकाणी लसीकरण सुरू असून जेष्ठ नागरिक आणि व्याधीग्रस्त नागरिकांनी कोणतेही भय न बाळगता लसीकरण करून घ्यावे असे आवाहन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.

Share now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *