जादा आलेले पाच हजार रुपये केले परत

मनपाच्या मिरज कार्यालयातील  कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा …… 

उपायुक्त यांनी केले कौतुक ….. 

मिरज :
सध्याच्या परिस्थितीत  पैशासाठी लुबाडणूक करणाऱ्यांची, फसवणूक करणाऱ्यांची व भ्रष्टाचार करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसत असतानाच समाजात प्रामाणिकपणाने वागणाऱ्या व्यक्तीही अद्याप आपले काम चोखपणे व प्रामाणिकपणे पार पाडत असल्याच्या घटना जनतेला दिलासा देत आहेत. मिरजेतील मनपाच्या घरपट्टी विभागातील एका प्रामाणिक कर्मचाऱ्याने देखील भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांसमोर एक आदर्श घालून दिला आहे. ग्राहकाकडून नजरचुकीने आलेले पाच हजार रुपये तात्काळ संबंधिताला बोलावून परत करणाऱ्या या कर्मचाऱ्याचे उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह सर्वानीच कौतुक केले आहे. 

मिरजेच्या ब्राम्हणपुरी भागातील मिळकतदार मुकुंद कुलकर्णी हे घरपट्टीची रकम भरण्यासाठी मिरजेच्या मनपातील संगणक विभागात गेले होते. त्यांनी घरपट्टी भरताना संगणक चालक अहमद कुरेशी यांच्याकडे  पाच हजार रुपये नजरचुकीने जादा दिले.   अहमद कुरेशी याना सदरची बाब लक्षात येताच त्यांनी मुकुंद कुलकर्णी यांना तात्काळ बोलावून घेतले व पाच हजार रुपये त्यांना परत दिले.  त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल मुकुंद कुलकर्णी यांनी उपायुक्त स्मृती पाटील मॅडम यांच्या उपस्थितीत अहमद कुशेरी यांचे आभार मानले. उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनीही कुरेशी यांच्या प्रामाणिकपणाचे मनापासून कौतुक केले आहे.  

Share now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *