काँग्रेसमधील विविध सेलच्या निवडी जाहीर; अनेकांचा पक्षप्रवेश

सांगली, दि. १७ : सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्या काही सेलच्या पदाधिकार्‍यांच्या निवडी आज जाहीर करण्यात आले यावेळी काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अध्यक्ष म्हणून याकूब हारूण मणेर यांची तर महापालिका स्वातंत्र्यसैनिक सेलचे अध्यक्ष म्हणून रघुनाथ बाळकृष्ण नार्वेकर यांची निवड करण्यात आली. श्री. पृथ्वीराज पाटील यांनी या निवडी जाहीर करून त्यांचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी आम आदमी पार्टीचे याकूब मणेर तसेच रेश्मा शरद थोरात, दीपक बाळासो बनसोडे, परवेज नगारजी, किरण कांबळे, सचिन पोटे (सांगलीवाडी) यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

यावेळी श्री. पृथ्वीराज पाटील म्हणाले, स्वातंत्र्य चळवळीमध्ये काँग्रेस पक्षाने मोठे योगदान दिले आहे. देशासाठी बलिदान देणारा हा पक्ष आहे. सर्व जाती-धर्माच्या लोकांचा हा पक्ष आहे. सर्व सामान्य माणसाला हाच पक्ष न्याय देऊ शकतो. या पक्षाचे बळ सध्या चांगल्या पद्धतीने वाढत आहे.

प्रास्तविक पैगंबर शेख यांनी केले, तर आभार बिपिन कदम यांनी मानले. यावेळी विजय आवळे, मौलाली वंटमुरे, पैगंबर शेख, माणिक कोलप, राजेंद्र कांबळे, नामदेव पठाडे, जावेद मुल्ला, प्रशांत अहिवळे, प्रफुल्ल थोरात, अल्पेश बनसोडे, सादिक मुजावर, शिवाजी कोळी, सुरज रजपुत, अश्विन वाघमारे, साई अनुसे, अजय तांगडे, विकास वाघमारे, यासीनभाई गोदड, सचिन माळी, राज शेख, अनिकेत पवार, अंकुश वाघमारे आदी उपस्थित होते.

Share now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *