बिरोबा आरेवाडी देवस्थान विकास कामासाठी वाढीव निधी-अजितदादा पवार

आम.अनिलभाऊ बाबर,विक्रम सावंत,सुमनताई पाटील यांची उपस्थिती

ना.अजित पवार,उपमुख्यमंत्री यांचे दालनात आज ना.अदित्य ठाकरे, मंत्री, ना. दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री, ना. विश्वजित कदम, राज्यमंत्री, ना.श्रीमती आदिती तटकरे, राज्यमंत्री, आ.श्रीमती सुमनताई पाटील, आ.अनिलभाऊ बाबर,आ. विक्रम सावंत तसेच संबंधित विभागाचे सर्व शासकीय अधिकारी , बिरोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने जगन्नाथ बिरु कोळेकर, .राहुल कोळेकर, कोंडिबा कोळेकर,दाजी  कोळेकर, समाधान कोळेकर, विजय कोळेकर,पांडूरंग बाबर, उपस्थित होते.

 ना.अजितदादा पवार यांनी सखोल चर्चा केली आणि  प्रमोद चौगुले, वास्तुशास्त्रज्ञ यांनी बिरोबा आरेवाडी देवस्थान विकास कामासाठी तयार केलेला आराखडा याचे सादरीकरण केले. त्यामधील 22 गाळे , भाविकासाठी राहण्याची व्यवस्था, व इतर उर्वरित कामांना गरजेनुसार  निधी उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे

Share now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *