त्या उमेदवारांनी घेतली काळ्या जादूची धास्ती

भानामतीच्या प्रकरणामुळे धाकधूक वाढल्याची चर्चा

कोथळी /प्रतिनिधी :-नामदेव भोसले
शिरोळ तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी आपलाच उमेदवार निवडून यावा या आशेपोटी अनेक उमेदवार व कार्यकर्त्यांनी भानामती सारख्या प्रकार निवडून सुई बिबा काळी बाहुली हळद-कुंकू लिंबू नारळ आधी साहित्य कापडात गुंडाळून चक्क मतदान केंद्राच्या बाहेर बांधण्याचा व चौकाचौकात टाकण्याचा प्रकार कोथळी दानोळी या गावात घडला आहे आजच्या विज्ञान युगात अंधश्रद्धेला कितपत खतपाणी घालावे हे उमेदवारांनीच ठरवलेलं बरे. मात्र भानामतीचा धस्का काही उमेदवारांनी घेतल्याचे चित्र त्या गावांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे निकाल लागेपर्यंत या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

शिरोळ तालुक्यातील दानोळी मध्ये निवडणुका च्या एक महिना अगोदर चौका-चौकात उतारा टाकून भानामतीचा प्रकार घडला होता. त्यावेळी गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन उतारा जाळून अज्ञात व्यक्ती विरोधात कडक कार्यवाही करण्याची मागणी केली होती. त्यानंतर कोथळी येथे पुन्हा भानामतीचा प्रकार घडला या गावातही चौकाचौकात उतारा टाकण्यात आला होता. मात्र गावातील तरुणांनी एकत्र येऊन अशा प्रकाराला खतपाणी न घालता या उताऱ्याची होळी केली. या प्रकरणामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झालेला आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काहीही करून आपला उमेदवार निवडून आणण्याच्या हेतूने अनेक तरुण वर्ग अंधश्रद्धेच्या आहारी जात असल्याचे चित्र कोथळी दानोळी या गावांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन पथकाची कार्यवाही शिरोळ तालुक्यात होणे गरजेचे आहे. या प्रकाराला वेळीच आवर घालणं गरजेचं आहे. अन्यथा येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये आशा भानामतीच्या प्रकाराचा मोठ्या प्रमाणात वापर होईल व अनेक युवक या अंधश्रद्धेला बळी पडतील हे मात्र नक्की. वेळोवळी कारवाई करण्याची गरजेचे आहे असे कोथळी दानोळी नागरिकांच्या चर्चा रंगत आहे.

Share now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *