महापालिकेच्या आरोग्यधिकाऱ्यांसह 7 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतली कोव्हीशिल्ड लस :

महापालिकेच्या आरोग्यधिकाऱ्यांसह 7 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतली कोव्हीशिल्ड लस : लस घेतल्यानंतर कसलाही त्रास नाही, ही लस सुरक्षित असून सर्वानी ती घ्यावी : आरोग्यधिकारी डॉ सुनील आंबोळे यांचे आवाहन

सांगली महापालिकेचे वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांच्यासह महापालिकेच्या 7 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोव्हीशिल्ड लस घेतली आहे. कोव्हीशिल्ड लस घेतल्यानंतर कोणालाही कसलाही त्रास झाला नाही. त्यामुळे ही लस सुरक्षित असून वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी ही लस घ्यावी असे आवाहन आरोग्यधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी केले आहे. बुधावरपर्यंत महापालिका आयुक्त नितीन कापडनीस यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाक्षेत्रात साडेचारशे जणांनी कोव्हीशिल्ड लस देण्यात आल्याचेही डॉ. आंबोळे यांनी सांगितले.
यामध्ये मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ वैभव पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ शीतल धनवडे, डॉ. अक्षय पाटील
यांच्यासह काही खासगी डॉक्टर आणि त्यांच्या स्टाफनेसुद्धा कोव्हीशिल्ड लस घेतली असून ज्यांनी लस घेतली आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नसून लसीकरण झाल्यानंतर ते पूर्ववत आपली सेवा बजावत आहेत. त्यामुळे कोव्हीशिल्ड लस ही सुरक्षित असून वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी ती घ्यावी असे आवाहनही डॉ सुनील आंबोळे यानी केले आहे.

Share now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *