सांगली विधानसभेसाठी काँग्रेसचे युवा नेते आणि स्व. मदनभाऊ पाटील यांचे जावई डॉ. जितेशभैय्या कदमांनी तयारी सुरु

सांगली विधानसभेसाठी काँग्रेसचे युवा नेते आणि स्व. मदनभाऊ पाटील यांचे जावई डॉ. जितेशभैय्या कदमांनी तयारी सुरु केल्याचे समजते. कोरोनापासून ते कालअखेर 

सांगलीत आणि ग्रामीण भागात सुद्धा त्यांनी सामाजिक राजकीय कार्यक्रमांना हजेरीलावायला सुरवात केली आहे. प्रतीक्षा भेटीगाठींवर जितेश कदम यांचा भर दिसत असून मतदारसंघात काँग्रेसचे संघटन करण्यासाठी डॉ. जितेश कदम ऑनफिल्ड दिसत आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जितेश कदम काँग्रेसचा उमेदवार असू शकतात अशी चर्चा आहे. 

      जितेश कदम यांनी सांगली विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचे विशेष करून मदनभाऊ पाटील गटाच्या कार्यकर्त्यांना संघटित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. भाऊंचा गट कायम राहावा आणि एकसंघ काँग्रेसच्या पाठीशी राहावा यासाठी जितेश भैय्या आपल्या परीने प्रयत्नशील आहेत. त्यातच त्यांनी सांगली विधानसभा मतदारसंघात अधिक जोर दिल्याने ते काँग्रेसचे संभाव्य उमेदवार असू शकतील अशी चर्चा जोर धरत आहे. स्व. मदनभाऊ यांचे ते जावई आहेत. त्यामुळे सांगली विधानसभा मतदारसंघात त्यांनी जोर लावल्याचे चित्र आहे. त्यामुळे जितेश कदम जर विधानसभेसाठी असतील तर नक्कीच सांगलीचा मतदारसंघ पुन्हा भाऊ प्रेमी खेचून आणतील अशीही जोरदार चर्चा आहे. मात्र जितेशभैय्या हे काँग्रेसचा नवा चेहरा म्हणून समोर येत आहेत हे मात्र नक्की आहे. 

Share now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *