सांगली महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून मिरज सिव्हीलचे फायर ऑडिट पूर्ण:

सांगली सिव्हीलचे ऑडिट सुरू : मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे यांची टीम सांगली सिव्हीलमध्ये दाखल

सांगली महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून मिरजेच्या शासकीय रुग्णालयाचे फायर ऑडिट पूर्ण करण्यात आले असून मंगळवारपासून सांगलीच्या सिव्हील हॉस्पिटलचे फायर ऑडिट सुरू करण्यात आले आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे यांची टीम सांगली सिव्हीलमध्ये फायर ऑडिटसाठी दाखल झाली असून ऑडिटला सुरवात झाली आहे.

भंडारा दुर्घटनेनंतर राज्य शासनाकडून राज्यातील सर्व शासकीय, खासगी हॉस्पिटलचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत सांगली आणि मिरज सिव्हिल हॉस्पिटलचे फायर ऑडिट करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले होते. यानुसार मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी आपल्या टीमकडून मिरज सिव्हीलचे फायर ऑडिट पूर्ण केले आहे. मंगळवारपासून मुख्य अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे यांच्या टीमकडून सांगली सिव्हिल हॉस्पिटलचे फायर ऑडिट सुरू करण्यात आले आहे. यामध्ये शासनाकडून आलेल्या सूचनांप्रमाणे फायर ऑडिट केले जात आहे. यामध्ये रुग्णालय इमारत परिसरात असणाऱ्या इमारतींची लांबी रुंदी, पाण्याच्या टाक्या, फायर एक्झिट आहे का, फायर रोधक सिलेंडर आहेत का? जिने किती आहेत, पायऱ्या किती आहेत याची संपूर्ण माहिती घेतली जात आहे. दोन दिवसात सांगली सिव्हीलचे फायर ऑडिट पूर्ण होईल अशी माहिती मुख्य अग्निशामक अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी सांगितले.

Share now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *