जत तालुक्यातील महिलांना बळ देऊन त्याना आर्थिक दृष्टा भक्कम करणार

महिला बचत गटांच्या प्रतिनिधी ,सौ.मिनल दीदी सावंत पाटील, सौ.वर्षाताई विक्रमसिंह सावंत

जत प्रतिनिधी प्रणय वाघमारे  : जत तालुक्यातील महिला बचत गटांच्या  प्रतिनिधी महिलांची बैठक जत येथे आ.विक्रमसिंह(दादा) सावंत यांच्या कार्यालयात पार पडली. त्यामध्ये महिला बचत गटांच्या सर्व अडीअडचणींवर विस्तारित चर्चा करून महिला बचत गटांना बळ देण्यासाठी जत तालुक्यात भव्य महिला मेळावा आयोजित करणे, महिलांना आर्थिकदृष्ठ्या सशक्त करणे ,सूक्ष्म कर्ज योजना यांची अमलबजावणी करणे यावर चर्चा करण्यात आली . यावेळी तालुक्यातील महिला बचत गटांच्या प्रतिनिधी ,सौ.मिनल दीदी सावंत पाटील, सौ.वर्षाताई विक्रमसिंह सावंत यांनी उपस्थित राहून महिला बचत गटांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. 

Share now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *