पूर्व पोलीस अधिकारी दीपाली काळे यांच्या सांगण्यावरूनच भंडारेने नंतरचे जबाब बदलले —– बचावपक्षाच्या वकिलांचा बचाव

राज्यभर गाजत असलेल्या सांगलीयेथील अनिकेत कोथळे खून प्रकरणात उलटतपासादरम्यान, सांगलीच्या पूर्व पोलिस उपविभागीय अधिकारी दीपाली काळे यांच्या सांगण्यावरूनच प्रत्यक्ष साक्षिदार अमोल भंडारेने नंतरचे जबाब बदलले
असा बचाव बचावपक्षाच्या वकिलांनी बुधवारी घेतला. सदरचा खून खटला मुख्य जिल्हा व सत्र न्या. विजय पाटील यांच्या न्यायालयात चालू आहे . सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे काम पाहत आहेत.
सांगली येथील अनिकेत कोथळे खून खटल्याचे कामकाज सध्या जिल्हा न्यायालयात चालू आहे. यात खटल्यातील प्रत्यक्ष साक्षीदार अमोल भंडारे याची साक्ष आज पूर्ण झाली. त्याच्या उलट तपासादरम्यान बचावपक्षाच्या वकिलांनी सांगली शहर पोलीस ठाण्यातील खुनाच्या घटनाक्रमातील विसंगती आणण्याचा प्रयत्न केला. तसेच अशी कोणतीही घटना घडली नव्हती. तसेच सांगलीच्या पूर्व पोलिस उपविभागीय अधिकारी दीपाली काळे यांच्या सांगण्यावरूनच प्रत्यक्ष साक्षिदार अमोल भंडारे याने नंतरचे जबाब बदलले, भंडारे याने दिलेले पहिले जबाबच बरोबर आहेत असा बचाव बचावपक्षाच्या वकिलांनी बुधवारी घेतला. मात्र घटनेतील प्रत्यक्ष साक्षिदार अमोल भंडारे याने घडलेल्या सर्व घटना ह्या खऱ्या असल्याचे न्यायालयासमोर स्पष्ट केले.
उलट तपासादरम्यान सरकारी वकील उज्ज्वल निकम आज बचाव पक्षाच्या वकिलांच्यात अनेकदा शाब्दिक चकमक उडाली. बचाव पक्षाचे वकील गिरीश तपकीरे आणि ॲड. सी.डी. माने यांनी आज उलट तपास घेतला. साक्षीदार भंडारे याचा उलट तपास आज पूर्ण झाला. खटल्यात सरकारपक्षाला सहा. सरकारी वकील प्रमोद भोकरे , सीआयडी चे पोलीस उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी सहकार्य केले.
पुढील सुनावणी २२ ते २४ फेब्रुवारीला चालणार आहे .

Share now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *