महापालिका क्षेत्रात 5 ठिकाणी लसीकरण

हनुमान नगर हेल्थपोस्टला लसीकरणाचे उदघाटन : आमदार सुधीर गाडगीळ , आयुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत सुरुवात

सांगली महापालिका क्षेत्रातील कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा शुभारंभ आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्याहस्ते करण्यात आला.
हनुमाननगर येथील कार्यक्रमास स्थायी सभापती पांडुरंग कोरे,

गटनेते युवराज बावडेकर, उपमहापौर आनंदा देवमाणे , प्रभाग सभापती अप्सरा वायदंडे, गीतांजली ढोपे पाटील, लक्ष्मी सरगर, नगरसेविका सविता मदने,

उर्मिला बेलवलकर, स्वाती शिंदे, नसीम शेख, कल्पना कोळेकर, नगरसेवक अभिजित भोसले, लक्ष्मण नवलाई, बाळासाहेब सावंत, रज्जाक नाईक, इरफान शेख, राहुल ढोपे पाटील, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील,

वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ सुनील आंबोळे, डॉ. वर्षा धनवडे, डॉ वैभव पाटील आदी उपस्थित होते. तर प्रत्यक्ष लसीकरण प्रक्रियेची सुरवात मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्याहस्ते करण्यात आली.

यावेळी नगरसेवक अभिजित भोसले, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव पाटील आदी उपस्थित होते. डॉ वर्षा पाटील यांना पहिले लसीकरण करण्यात आले.

Share now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *