सांगलीत पहिले पंचतत्व साहित्य संमेलन

सांगलीत पहिले पंचतत्व साहित्य संमेलनपंचतत्व पुरस्कार वितरण; 23 रोजी आयोजन

माधवनगर: जल, अग्नी, पृथ्वी, वायू आणि आकाश या पंचमहातत्वांचे महत्व आणि महात्म्य समाजापर्यंत नेण्यासाठी श्री महाराज पंचतत्व सेवा प्रतिष्ठानच्यावतीने सांगलीत पहिल्यांदाच पंचतत्व साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार 23 जानेवारी रोजी होणार्‍या या संमेलनामध्ये पंचतत्व पुरस्कारांचे वितरणही करण्यात येणार आहे.
याबाबत माहिती देताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पोळ यांनी सांगितले की, जल, अग्नी, पृथ्वी, वायू आणि आकाश या पंचमहातत्वाची नव्याने ओळख व्हावी, त्याबाबतचा अभ्यास होऊन त्याचा व्यक्ती आणि समाजकल्यासाठी उपयोग करुन घेता यावा यासाठी साहित्यिकांची भुमिकाही महत्वाची आहे. यासाठीच या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमीत्ताने पंचतत्व सेवा पुरस्कारांचेही वितरण करण्यात येणार आहे. आकाशदेवता रंगभूमी पुरस्कार संपत कदम यांना, अग्निदेवता समाजसेवा पुरस्कार अर्चना मुळे यांना, वायुदेवता आरोग्य सेवा पुरस्कार महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र ताटे यांना, जलदेवता साहित्य सेवा पुरस्कार सचिन पाटील यांना तर पृथ्वीदेवता वसुंधरा सेवा पुरस्कार अ‍ॅनिमल राहतचे कार्यकर्ते कौस्तुभ पोळ यांना प्रदान करण्यात येणार आहे. संमेलनास अ‍ॅड. शाम जाधव, विजय कडणे, प्रा. भरतेश्वर पाटील, मुकुंद पटवर्धन, कुलदीप देवकुळे आदी उपस्थित राहणार असून हे संमेलन कर्नाळ रोडवरील पंचतत्व मंदिर येथे दुपारी तीन वाजता होणार असल्याचे पोळ यांनी सांगितले.  

Share now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *