आत्मनिर्भर भारत निर्माणसाठी सांगलीच्या रँचो ने हरिपूर येथे उभारला संशोधनाचा कारखाना,

अँकर:-आत्मनिर्भर भारत निर्माणसाठी संशोधकाने हरिपूर येथे संशोधनाचा कारखाना उभारला आहे. यासाठी या ध्येयवेड्या संशोधकाने परदेशात उच्च शिक्षण घेऊन मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी घुडकावली आहे,

मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील असलेल्या ,, शाम गुरव यांनी अवकाश विषयावर नेदरलँड येथे डॉक्टरेट मिळवली आहे. मद्रास येथे त्यांनी एम.टेक्‌.चे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी एअरक्राफ्ट डिझायनिंग क्षेत्रात काम केले. नासाच्या एका प्रकल्पातही त्यांनी काम केले आहे. सध्या ते अहमदाबाद विद्यापीठात सल्लागार म्हणून काम करीत आहेत.
परदेशात नोकरी व उद्योगाच्या अनेक संधी त्यांना आहेत . मात्र गुरव यांनी आत्मनिर्भर भारत निर्माणसाठी हरिपूर येथे संशोधनाचा कारखाना उभारला आहे. मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल अभियंत्यांना त्यांनी यात समावून घेतले आहे. सुरुवातीला त्यांनी अपंग व वयोवृद्ध लोकांसाठी लागणाऱ्या इलेक्ट्रिकल व्हिलचेअरचा प्रयोग हाती घेतला. त्यात त्यांना यश मिळाले. ज्या व्हिलचेअरची बाजारात १ ते सव्वा लाख किंमत आहे, तितक्याच सुविधांची व्हिलचेअर ७५ टक्के कमी किमतीत त्यांनी तयार केली. लॉकडाऊन काळात त्यांनी इलेक्ट्रिकल सायकल तयार केली. छोट्या मोपेडचा फिल येणाऱ्या, पण सायकलचा लूक असणाऱ्या वजनाने अत्यंत हलक्या अशा इलेक्ट्रिकल सायकलचा प्रयोगही त्यांनी यशस्वी केला आहे. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ही फॅक्टरी आनंद व त्यांच्या संशोधन वृत्तीला वाव देणारी ठरत आहे.
याबाबत प्रा. शाम गुरव म्हणाले की मी मूळचा जयसिंगपूर चा जरी असलो तरी मी ,,सांगली जिल्ह्यात शिक्षण घेऊन करिअरच्या वाटा शोधत राज्यभर फिरणाऱ्या मुलांना रोजगार आणि संशोधनाची संधी देण्यासाठी ग्रामीण भाग असलेल्या हरिपुरात कारखाना सुरू केला आहे.प्रचंड आर्थिक कसरत यासाठी करावी लागली आहे. याकामी अभियंत्यांना प्रकल्पात समावून घेताना परिसरातील गोरगरीब मजुरांनाही काम दिले आहे. कारखान्याची व्याप्ती वाढविताना व्यावसायिकतेपेक्षा समाजासाठी आवश्यक उपकरणांची परवडणाऱ्या दरात निर्मिती करण्याचा उद्देश आहे.
दरम्यान या संशोधकाने हरिपूर येथे संशोधनाचा कारखाना उभारून नवनव्या प्रयोगांना जन्म दिला. इलेक्ट्रिकल सायकल, इलेक्ट्रिकल व्हिलचेअर, मोल्डलेस कंपोझिट फायबर, सोलर पॉवरबेस इलेक्ट्रिक रिक्षा असे अनेक प्रयोग त्यांनी यशस्वी केले आहेत. पाहुयात याचा एक स्पेशल रिपोर्ट,,,

बाईट:- शाम गुरव ( संशोधक)
बाईट:- वेदिका जोशी ( विद्यार्थिनी )
बाईट:- अंजली यादव ( विद्यर्थिनी )
बाईट:- ऋषिकेश गुरव (विद्यार्थी)

Share now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *